2024 हीरो मावरीक ४४०:हीरो सर्वात पॉवरफूल बाईक भारतात लॉंन्च

2024 HERO MAVRICK 440

हीरोने केला मोठा धमाका हीरो मोटॉक्रॉपची सर्वात पॉवरफूल दुचाकी हीरो मावरीक ४४० ही कमी किंमतीत प्रीमियम दुचाकी भारतीय बाजारात लॉंच करण्यात आली आहे. ही नव्या रूपात व आकर्षक डिझाईन मध्ये तीन वेग-वेगळ्या व्हेरिएंट्स मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.या आकर्षक अश्या दुचाकीला विकत घेण्यासाठी बूकिंग सुरू झाली आहे.तर आपण हीरोच्या ऑनलाइन वेबसाइट वर जावून बूक करू शकता आणि १५ मार्चच्या आधी जर तुम्ही हीरो मावरीक ४४० बूक केली तर तुम्हाला १०,००० रुपयापर्यंत मावरीक किट ऑफ अॅक्ससरीज व मर्चंडाईस या ऑफरचा लाभ मिळणार,तर लवकरात लवकर तुम्ही बूकिंग करून ह्या ऑफरचा फायदा घ्या.

2024 HERO MAVRICK 440 Design

हीरो मावरीक ४४० ही Harley-Davidson व Hero Motocorp याच्या एकत्रित मिळून बनवलेली पॉवर फूल बाईक लॉंच करण्यात आली आहे.ट्रेललीस फ्रेम बॉडी मेटल अरमोवेर टाकी,Y-आकाराचे साइड कवर व मेटल बिल्ड हे मजबूतपणा वाढवते.एच-आकाराचे DRL सह गोल हेड लॅम्प आधुनिक भव्यता आणते.

2024 HERO MAVRICK 440 Variant

या दुचाकी तीन व्हेरिएंट्स लॉंच केले आहेत. बेस,मिड आणि टॉप असे आहेत त्या पैकी बेस व्हेरिएंट् हे आर्क्टिक व्हाइट तर मिड व्हेरिएंट् फेअरलेस रेड आणि सेलेस्टियल ब्ल्यु मध्ये तर टॉप व्हेरिएंट् हे फनटोम ब्लॅक व एनिगम ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे

2024 HERO MAVRICK 440 Features

मेटल अरमोवेर टाकी,Y-आकाराचे साइड कवर मेटल बिल्ड हे मजबूतपणा वाढवते.एच-आकाराचे DRL सह गोल हेड लॅम्प आधुनिक भव्यता आणतो.सर्व एलईडी लायटिंग ने सुसज्ज व डिजिटल स्पीडोमीटर,नेव्हिगेशन डिस्प्ले सह स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सह सुसज्ज सोयीनुसार अचूक टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि गियर इंडिकेटर आणि या दुचकीमध्ये ब्ल्युटूथ कनेक्टिव्हिटी असे आधुनिक फीचर्स ने परिपूर्ण आहे.१७ इंचची चाके आणि ओ स्टील रेडियल पॅटर्न टायर्सचा समावेश केला आहे.मागील सीटला बॅक रेस्ट पण देण्यात आलेला आहे.

2024 HERO MAVRICK 440 Engine

या दुचाकी मध्ये ४४०cc सिंगल सिलेंडर एयर कूल्ड किंवा ऑइल कूल्ड TORQX इंजिन आहे. जे ६००० आर पी एम वर २०.१३ केएम/२७ बी एच पी ची पॉवर आणि ४००० आर पी एम वर ३६ एन एम चा टॉर्क जनरेट करते. ज्यामुळे थंपिंग एकझॉस्ट आवाज येतो जो लक्ष वेधून घेतो.स्लीपर क्लचसह ६ स्पीड ट्रान्समिशन राइडचा उत्तम अनुभव देतो.

2024 HERO MAVRICK 440 Brakes

हीरो मावरीक ४४० मध्ये या दुचाकीला पुढील सस्पेंशन टेलीस्कोपिक फ्रंट फॉर्क व मागील सस्पेंशन हायड्रोलिक रीयर ट्विन शोक्ष स्विनग माऊंट हे आरामदायी प्रवासाठी दिले आहेत आणि याची ब्रेकिंग सिस्टम ABC बरोबर पुढे ३२०mm डिस्क ब्रेक व मागे २४०mm डिस्क ब्रेक जोडण्यात आले आहेत.इंधन टाकीची क्षमता ३३.५ लिटर इतकी आहे.

2024 HERO MAVRICK 440 Price

या दुचाकीचे तीन व्हेरिएंट भारतीय बाजारात लॉंच करण्यात आले आहेत.बेस व्हेरिएंट्ची किंमत १,९९,००० रुपये व मिड व्हेरिएंट्ची किंमत २,१४,००० रुपये आणि टॉप व्हेरिएंट्ची किंमत
२,२४,००० रुपये एक्स शोरूम किंमती आहेत.हीरो मावरीक ४४० दुचाकीची बूकिंग तुम्ही ५,००० रुपये (है पैसे रिफंड मिळतील ) टोकन किंमत देवून तुम्ही ऑनलाइन बूक करू शकता किंवा जवळच्या हीरो मोटॉक्रॉपच्या शोरूमला भेट देऊन डीलर कडे माहिती व तिची बूकिंग करू शकता.